“मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा” यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उदयनराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा अभिषेक केला. मराठा साम्राज्याची राजधानी सातारा मध्ये जलमंदिर राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छ शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा अभिषेक करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा यामधील मुस्लिम बांधवांनी जलमंदिर पॅलेस येथे छत्रपतीं उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचार प्रताप आणि गुण अंगीकारणे आणि छ. शिवाजी महाराजांचे विचार तळागाळत पोहोचविणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असेल, असे सादिकभाई शेख म्हणाले.