अग्रहरी समाज नवयुवक मित्र मंडळातर्फे, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शनिवारी दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी वाशी गावदेवी मंदिरासमोर सर्व गणेशभक्तांना वडापाव, फळे व पाणी वाटप करण्यात आले. हा उपक्रम सलग अकरा वर्षांपासून आयोजित केला जात असून, समाजातील युवकांच्या पुढाकारातून तो अधिकाधिक यशस्वी होत आहे. मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष मुकेश गुप्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी या कार्यक्रमात उपस्थित होत्या. गणेशभक्तांना प्रसादासह अल्पोपहार देऊन समाजात एकोपा व सेवाभाव जपण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त केला जात आहे.