सातारा सांगली विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू आहे. परंतु यामध्ये महायुतीमध्ये सर्वकाही अल्बेला आहे असं दिसत नाही. माहितीचे घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्ष कुठेतरी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.या चर्चेला अखेर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानानंतर बळ मिळालेला आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दर्या गावी आले असताना त्यांच्यामध्ये जवळपास एक तास कमरा बंद चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलत असताना शंभूराजे देसाई यांनी भाजपाच्या सध्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही बैठकांना शिवसेनेला विचारात घेतल्या जात नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले.यावेळी बोलत असताना शंभूराज देसाई म्हणाले सध्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी झालेली आहे. तर आम्हाला जर कोणत्याही बैठकांचं निमंत्रणच नाही तर आम्ही मग कोणत्या गाडीत बसायचं असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी खेडेगावात प्रचलित असलेल्या म्हणीचा संदर्भ देत येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी महायुती मध्ये अवस्था असल्याचं बोलून दाखवलं.