एचपीव्ही लसीचे डोस घेतल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका ८५ ते ९० टक्के कमी होतो. १४ वर्षाखालील मुलींना मोफत ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही लस देण्यास सुरूवात झाली आहे. हे लसीकरण भविष्यातील आरोग्यासाठी एक सुरक्षा कवच असणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली. मागील काही वर्षापासून महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. गर्भाशयाच्या मुलाखा कर्करोग मुळापासून उपटून टाकण्यासाठी आता १४ वर्षे वयोगटातील मुलींना ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस ही लस मोफत दिली जाणार जात आहे. एचपीव्ही लसीकरण हे १४ वर्षे वयोगटातील (ज्यांनी १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत, १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत) त्या मुलींना देण्यात येत आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसाच्या कालावधीत १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या तीन महिन्याच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत लसीकरणास पात्र राहणार आहे.