पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा, आज याचं पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांना लक्ष घालण्याची वेळ आलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दबाव असू शकतो. पण आमचे अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळं आमचा ही दबाव आयुक्तांवर असायला हवाच. असं स्थानिक राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याचं अनुषंगाने सुनेत्रा पवारांनी आज पालिका आयुक्तांना बजेटमध्ये राष्ट्रवादीने सांगितलेल्या कामांची तरतूद करावी, अशा सूचना दिल्यात. 21 फेब्रुवारीला सादर झालेल्या पालिकेच्या बजेटमध्ये आयुक्तांनी भाजपला झुकतं माप दिलं असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. तसाच न्याय मिळावा म्हणून स्थानिक राष्ट्रवादीने हा खटाटोप केलाय. यानिमित्ताने भाजप-राष्ट्रवादीत बजेटसाठी चढाओढ सुरु झालीये. आगामी पालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे बजेट सादर होत असल्यानं भाजप-राष्ट्रवादीत अशी रस्सीखेच सुरुये.