ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कक्षात बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर तिवारीच्या अवमानजनक कृत्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केला. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आणि संविधानाच्या प्रत हातात धरून शांतपणे निषेध व्यक्त केला. न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला करणारा हा प्रकार असल्याचे मत व्यक्त करत कार्यकर्त्यांनी संविधान आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्याचा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.