धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सत्ताधारी पाटील घराण्यावर निशाणा साधला. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगूनही धाराशिव शहरी विकासासह विविध कामांना तसेच डीपीडीसी निधीला जाणीवपूर्वक स्थगिती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांचे राजकारण म्हणजे नीचपणाचा कळस असून, जनता सर्व पाहत आहे आणि योग्य वेळी उत्तर देईल, असे ते म्हणाले.