बीडच्या परळी येथील श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच अलोट गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात सर्व वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येण्याचा अंदाज असून यादृष्टीने मंदिर संस्थान तसेच पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता तीन रांगा करण्यात आल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.. आज श्रावण सोमवार निमित्त सकाळपासूनच प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेले भाविक रांगेत उभा असलेले पाहायला मिळत असून सायंकाळपर्यंत लाखो भाविक या ठिकाणी दाखल होतील.. मंदिर संस्थान कडून आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.