नवी मुंबईतील राजकारण प्रचंड तापले असून,शिवसेना भाजप मधील संबंध ताणले गेले आहे. चार दिवसांपूर्वी ऐरोली मतदार संघाचे भाजप उमेदवार गणेश नाईक यांनी आपल्याला 1999 ला काहींनी मला चीटींग करून हारवले मात्र आज ते सर्वजण स्वर्गस्थ झाले,या वक्तव्याला विजय चौगुले यांनी आनंद दिंघे यांच्या सोबत जोडत,गणेश नाईकांनी आनंद दिघे साहेबांना असे बोलणे म्हणजे हा अपमान असून आम्ही सहन करून घेणार नसल्याचे सांगितले तर आज त्याच वक्तव्याचा निषेध म्हणून विजय चौगुले आणि शिवसैनिक आंदोलन करत आहेत.तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसैनिक निषेध आंदोलन करत आहेत.यावेळी विजय चौगुले यांनी दिघे साहेब आमचे दैवत असून आम्ही असे वक्तव्य खपवून घेणार नाही.यांना माज आला असून आम्ही तो उतरवणार. यांना धडा शिकवण्यासाठी आता माघार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी विजय चौगुले यांनी दिली…