गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी
घटनेची माहिती मिळताच वन विभाग टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात हा मृतदेह खरोखर एका हंपबॅक व्हेल असल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, व्हेल माशाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा आणि नंतर त्याचा मृतदेह समुद्राच्या लाटांसह किनाऱ्यापर्यंत पोहचला.
कधी घडली घटना?
माहितीनुसार, ही घटना रविवारी गुजराच्या वेरावल समुद्रकिनाऱ्यावर घडून आली. किनाऱ्यावर अचानक हंपबॅक व्हेल माशाचा मृतदेह पाहून पर्यटक हादरले आणि घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. साधारण ४० फूट लांबीचा हा व्हेल माशाचा हा मृतदेह सर्वांनाच थक्क करणारा होता. सूचना मिळताच वन विभाग आणि स्थानिक प्रशासन टीम घटनास्थळी पोहलची आणि त्यांनी परिस्थिती हाताळली.
मृत्येचे कारण काय?
वन विभागाला संशय आहे की, मोठ्या ट्रॉलर किंवा जहाजाची धडक बसल्याने या हंपबॅक व्हेल माशाचा मृत्यू झाला असावा. तथापि, हा प्राथमिक संशय असल्याचे अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सखोल तपास आणि पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे खरे कारण समजेल.
टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral
मशीन्सच्या मदतीने मृतदेह हटवला
व्हेलचा आकार विशाल असल्याने माणसांकडून त्याला उचलणे कठीण होते. अशात अधिकाऱ्यांनी मशीन्सचा वापर करुन व्हेल माशाला किनाऱ्यावरुन उचलले. वन विभागाने व्हेल माशाला सुरक्षित ठिकाणी पोहचवले असून विशेषज्ञांच्या उपस्थितीत माशाचे शवविच्छेदन करण्यात येईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच माशाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. याबरोबरच वन विभाग या घटनेचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहे.



