(फोटो सौजन्य: Instagram)
इंटरनेटवर उडवली जातेय खिल्ली
भारतीय रेल्वेत टीटीईचा थाट काही वेगळाच असतो. त्यांच्या येण्यानेच अनेकांना घाम फुटतो तर सूटबूटमध्ये आलेल्या टीटीईंना पाहून साहेबाची फिलिंग येऊ लागते. अशात पाकिस्तानी टीटीईचा एकदम साधा आणि खाकीतील पेहराव पाहून अनेक यूजर्सना निराशा वाटली. हा असा टीटीई पहिल्यांदाच पाहिला अशा प्रतिक्रिया यूजर्स व्हिडिओवर व्यक्त करु लागले.
व्हिडिओ व्हायरल
सोशल मिडियावर व्हायरल होत असेलल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाकिस्तानी टीटीई रेल्वेत मोबाईल आणि स्कॅनिंग मशीन घेऊन तिकीट तपासताना दिसून येईल. व्हिडिओ काही सेकंदाचा असतो पण त्यातील दृष्ये मात्र सोशल मिडियावर एक वेगळाच युक्तीवाद सुरु करतात. ही घटना इंटरनेटवर आता चांगलीच व्हायरल होत असून यूजर्सने टीटीईच्या या पेहरावाची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडिओ @pktrains नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “पाकिस्तानच्या ट्रेन्समध्ये फर्स्ट क्लास असतो का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हा टीसी आहे की बस कंडक्टर?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भारतात तर या पेहराव्यात हवालदार असतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.