Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी

Dead Humpback Whale : गुजरातच्या वेरावळ समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ४० फूट लांबीची हंपबॅक व्हेल मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. महाकाय व्हेल पाहण्यासाठी किनाऱ्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2026 | 02:10 PM
गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी

गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी

Follow Us
Follow Us:
  • ४० फूट लांबीची हंपबॅक व्हेल मृतावस्थेत.
  • मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट.
  • मशीन्सच्या मदतीने व्हेलचा मृतदेह हटवला.
गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ समुद्रकिनाऱ्यावर ४० फूट लांबीच्या महाकाय हंपबॅक व्हेल माशाचा मृतदेह आढळून आला आहे. समुद्राच्या वेगवान लहरींसोबत व्हेलचा हा मृतदेह किनाऱ्यावर आला ज्याला समुद्रकिनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला. हंपबॅक व्हेलचा मृतदेह पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली, तर अनेकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हात आहे की हातोडा? २१ वेळा ५० कॅन्सचा केला चुराडा, अनोख्या कारनाम्याची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

घटनेची माहिती मिळताच वन विभाग टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात हा मृतदेह खरोखर एका हंपबॅक व्हेल असल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, व्हेल माशाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा आणि नंतर त्याचा मृतदेह समुद्राच्या लाटांसह किनाऱ्यापर्यंत पोहचला.

कधी घडली घटना?

माहितीनुसार, ही घटना रविवारी गुजराच्या वेरावल समुद्रकिनाऱ्यावर घडून आली. किनाऱ्यावर अचानक हंपबॅक व्हेल माशाचा मृतदेह पाहून पर्यटक हादरले आणि घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. साधारण ४० फूट लांबीचा हा व्हेल माशाचा हा मृतदेह सर्वांनाच थक्क करणारा होता. सूचना मिळताच वन विभाग आणि स्थानिक प्रशासन टीम घटनास्थळी पोहलची आणि त्यांनी परिस्थिती हाताळली.

मृत्येचे कारण काय?

वन विभागाला संशय आहे की, मोठ्या ट्रॉलर किंवा जहाजाची धडक बसल्याने या हंपबॅक व्हेल माशाचा मृत्यू झाला असावा. तथापि, हा प्राथमिक संशय असल्याचे अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सखोल तपास आणि पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे खरे कारण समजेल.

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral

मशीन्सच्या मदतीने मृतदेह हटवला

व्हेलचा आकार विशाल असल्याने माणसांकडून त्याला उचलणे कठीण होते. अशात अधिकाऱ्यांनी मशीन्सचा वापर करुन व्हेल माशाला किनाऱ्यावरुन उचलले. वन विभागाने व्हेल माशाला सुरक्षित ठिकाणी पोहचवले असून विशेषज्ञांच्या उपस्थितीत माशाचे शवविच्छेदन करण्यात येईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच माशाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. याबरोबरच वन विभाग या घटनेचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहे.

Web Title: 40 feet humpback whale found dead on veraval beach gujarat forest department investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Gujrat
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
1

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
2

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
3

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral
4

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.