ट्रेनच्या विंडोसीटवर मोबाईल खेळत होती चिमुकली इतक्यात असे काही झाले की...; पाहा पुढे काय घडलं
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा सत्य घटनांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. कधी युद्धाचे, कधी एखाद्या अपघाताचे तर कधी चोरीच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक बारतीय रेल्वेच्या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. पण व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी ट्रेनच्या विंडोसीटजवळ मोबाईल खेळत असताना ही चोरी झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेबाबत तक्रार करण्यात आली की, नाही हे अद्याप कळालेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलगी ओरडली करी कोणी मदतीसाठी पुढे आलेले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी विंडो सीटवर बसून फोन वापरत आहे. तिच्या पुढच्या सीटवर देखील आमखी एक मुलगी फोन वापरत आहे. तेवढ्यात असे काही तरी घडते की, तेथील सर्व लोक आवाक् झाले आहेत. ती मुलगी फोन वापरत असताना अचानक कोणीतरी खिडकीतून बाहेरून दोन हातांनी येऊन तिचा फोन हिसकावून घेतो. ती मुलगी फोन पकडून ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र तोपर्यंत फोन हिसकावून घेतला जातो. ही घटना घडत असताना यावेळी मुलीला मदत करण्याऐवजी कोचमध्ये असलेली एक व्यक्ती व्हिडिओ कॅमेरॉत रेकॉर्ड करत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
“ट्रेन में बैठते समय सावधानी बरतें”
देखिए कैसे खिड़की में से बच्ची से फोन छीनकर चला गया !!
आजकल फोन चोरी वाली घटनाएं कुछ ज्यादा बढ़ रही हैं !!#ViralVideo #Trending #tren pic.twitter.com/C4bRzGKcfY— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) October 2, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ManojSh28986262 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ट्रेनमध्ये बसताना काळजी घ्या. बघा कसा खिडकीतून फोन हिसकावून घेतला गेला. आजकाल फोन चोरीच्या घटना वाढत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला स्क्रीप्टेड असल्याचे म्हटले आहे. तर एका युजरने म्हटले आहे की, व्हिडिओ काढणाऱ्याला 21 तोपांची सलामी द्यावी, उत्तम व्हिडिओ काढला आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, रेल्वेने अशा घटनांबाबत कारवाई केली पाहिजे.