फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज नवीन काही ना काही आपल्याला पाहायला मिळत असते. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही मेट्रोमधील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी भांडणाचे तर कधी डान्सचे रील्स, तर कधी मेट्रोत पत्ते खेळतानाचे असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तसेच तुम्ही मेट्रोमध्ये अनेकादा लोकांना विचित्र गोष्टी घेऊन जाताना पाहिल्या असतील. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे.
एक महिला मेट्रोमध्ये जात असताना अचानक तिच्या पिशवीतून जिवंत खेकडे बाहेर पडू लागले आहेत. हे दृश्य पाहून मेट्रोमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला आहे. काही महिन्यापूर्वी एक व्यक्ती मेट्रोमध्ये सापांना घेऊन जात होता तर आता ही महिला खेकड्यांना घेऊन जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे.
बॅगेतून खेकडे बाहेर कसे आले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गर्दीने भरलेल्या मेट्रोच्या डब्यातून अचानक एका महिलेच्या पिशवीतून खेकडे बाहेर येऊ लागतात. तेव्हा ती महिला घाबरून उडी मारते आणि थेट दरवाजाकडे धावते. मात्र, पिशवीतून आणखी खेकडे बाहेर येऊ लागल्याने शेजारी उभी असलेली एक व्यक्ती, ज्याला हे दृश्य पाहून आश्चर्य वाटले, तो लगेचच महिलेच्या मदतीसाठी पुढे येते. अजूनही काही प्रवाशी तिला खेकडे उचलण्यास मदत करतात. तर काहीजण घाबरून लांब होतात. व्हिडिओमध्ये ती महिला खेकडे तुटलेल्या पिशवीत सुरक्षितपणे ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @subwaycreatures अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओ लाईक करून यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘काका खेकडा धरून बसलेले पाहून आश्चर्यचकित झालो, त्यांच्या कसलीच भिती वाटत नाहीय का, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, विमानात साप आणि ट्रेनमध्ये खेकडे, हेच बघायचे बाकी होते. तर आणखी एकाने म्हटले आहे की, मला समजत नाही की पेपरमध्ये जिवंत खेकडे कोण ठेवतात.