तरुणाला जीवघेणी करामत चांगलीच भोवली! काटेरी शस्त्रावर पडला पाय अन् क्षणार्धात... Video Viral
आजकाल बहुतेक तरुणांना रील्स बनवण्याची आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडिया स्टार बनण्याची आवड आहे. रील बनवून प्रसिद्ध व्हायचे यात काही गैर नाही, पण या प्रसिद्धीच्या मागे लोक ज्या प्रकारे जीव धोक्यात घालत आहेत ते चुकीचे आहे. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये लोक धोकादायक स्टंट करताना दिसले असतील. कुणी बाईकवर स्टंट करतोय, कुणी चालत्या ट्रेनच्या दारात स्टंट करतोय तर कुणी उंच इमारतीला लटकून स्टंट करतोय.
सध्या अशाच एका जीवघेण्या कारामतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात एक तरुण भीतीदायक स्टंट करताना दिसून येत आहे. मात्र आपली अतिहुशारी त्याला चांगलीच महागात पडते आणि स्वतःने रचलेल्या डावात तो स्वतःच अडकतो. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला विचलित करतील आणि क्षणार्धासाठी तुमचा श्वासदेखील रोखतील. व्हिडिओ व्हायरल होताच आता अनेकांनी यावर आपला संताप व्यक्त केला आहे. नक्की या व्हिडिओत काय आहे ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – पोलीस महिला अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा, ऑन ड्युटीवर असताना केले किस, लज्जास्पद Video Viral
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा दोन विटांवर उभा असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या दोन विटांमध्ये धारदार खंजीर अडकल्यासारखे काहीतरी आहे. एवढेच नाही तर ही वीट टायरमध्ये ठेवली जाते आणि टायरच्या बाजूला अनेक धारदार खंजीरसारखे काटेरी लोखंडे जोडलेले असतात. हे सर्व दृश्य पाहूनच एकद्याला धडकी भरेल. तरुण या काटेरी लोखंडाच्या रिंगणात विटेवर उभा असतो. यानंतर तरुण विटांवरून उडी मारत पाठीमागे पलटी मारली आणि पुन्हा त्याच विटांवर उतरण्याचा पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याने जसा विचार केला होता तसे घडत नाही आणि शेवटी नको तेच घडते.
उलटी उडी मारताच त्याचा तोल थोडासा ढासळतो आणि त्याचा एक पाय विटेच्या मध्यभागी ठेवलेल्या खंजीरावर जाऊन पडतो. ते टोकदार खंजीर त्याच्या एका पायात रुतते आणि अडकते. हे सर्व दृश्य थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्या अंगावर काटा आणून देते. आता खंजीर त्याच्या बुटात अडकला की पायातही अडकला हे स्पष्ट झालेलं नाही, पण हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या शेवटी तरुणाची आई हातात काठी घेऊन त्यालामारताना दिसून दिसत आहे. लोक मजा घेत तरुणाची ही करामत पाहत आहेत.
Whyy??😭😭
pic.twitter.com/9LAUQ3apqW— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 24, 2024
हेदेखील वाचा – Video Viral: म्हशींच्या कळपाला पाहून सिंहाची हवा झाली टाइट, झोपेचे नाटक करू लागला तितक्यात म्हशींनी केलं असं…
स्टंटबाजीचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, का?? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. अनेक युजरने या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भितीदायक स्टंट. चूक झाली, पण तरीही, देवाचे आभार, तो ठीक आहे, पण त्याची आई म्हणत असेल.. रुक जाव बेटा बताते है तुमको… और करो स्टंट..” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यार, हा आईला का त्रास देत आहे, काही झालं तर?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.