धक्कादायक! चालू ट्रेनमधून व्यक्तीने मुलाला बाहेर फेकले... भयानक दृश्ये कॅमेरात कैद, पाहूनच अंगावर काटा येईल; Video Viral
सोशल मीडियावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत असतात. इथे बरेच असे व्हिडिओ, घटना शेअर केल्या जातात ज्यांचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील. आता ट्रेन प्रवास म्हटला की, त्यात भांडणं, बाचाबाची हे प्रकार होणे सामान्य आहे. या घटनेतही असेही काहीसे घडल्याचे दिसले, ज्यात एक काका आणि मुलगा यांच्यात काही वाद सुरु होता. पण भांडणाच्या वेळी दोघांमध्ये अशी बाचाबाची झाली की काकांनी रागाच्या भरात मुलाला ट्रेनखाली फेकले.
ट्रेनमध्ये घडलेली ही भयानक घटना एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्ये सर्वांसाठी फार धक्कादायक आणि भयानक आहेत. लोक आता हा विडिओ पाहून आवाक् झाले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. घटनेत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात ट्रेनच्या दरवाज्याजवळ काका आणि तरुणामध्ये जोरदार वाद झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, तरुणाने रागाच्या भरात काकांवर हात उगारला, त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. भांडणात काका त्या मुलाला ढकलून ट्रेनखाली फेकतात. मुलगा ट्रेनमधून खाली पडल्यानंतर, काका शांत चित्ताने मागे वळतात आणि देवाची माफी मागून आपल्या सीटवर बसतात. आपण एका मुलाला चालू ट्रेनमधून बाहेर फेकले आहे याची कोणतीच खंत काकांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही.
तरुणीने बाथरूमलाच बनवले आपले घर, इथे जेवते इथेच… घराचे भाडे फक्त 500 रुपये
हा व्हायरल व्हिडिओ @tag_news_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘एका तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काकांनी लगेच देवाची माफी मागितली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरेस्ट करा त्यांना” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पाप पण केले आणि माफीही मागितली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.