तरुणीने बाथरूमलाच बनवले आपले घर, इथे जेवते इथेच... घराचे भाडे फक्त 500 रुपये
आपण कामानिमित्त कुठे बाहेरगावी गेलो की सर्वात पहिली गोष्ट आपण जी करतो ते म्हणजे घर बघणे. अशात अनेकांचा एक स्वस्त घर घेण्याकडे अधिक कल असतो जेणेकरून आपले पैसे वाचले जातील. मात्र सध्या एक अजब प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एका तरुणीने चक्क आपल्या बाथरूमला आपले घर बनवले आहे. ही धक्कादायक बातमी चीनमधून समोर आली आहे, जिथे एक महिला तिच्या ऑफिसच्या बाथरूममध्ये राहते. इतकंच नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी आणखी एक गोष्ट म्हणजे ती महिला ऑफिसच्या बाथरूममध्ये राहण्यासाठी भाडेही देते. हे ऐकून आता अनेकांचे कान उंचावले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
चीनमधील एका 18 वर्षीय महिलेने राहणीमानाचा खर्च कमी करण्यासाठी तिच्या कामाच्या ठिकाणी बाथरूमला तिच्या घरात बदलले. ती फर्निचरच्या दुकानात काम करते आणि तिच्या बॉसला तिची खाजगी जागा म्हणून बाथरूम वापरण्यासाठी दरमहा $5 (सुमारे 545 रुपये) देते, असे न्यूयॉर्क पोस्ट (NYP) च्या अहवालात म्हटले आहे. यांगने सुरुवातीला दरमहा सुमारे 2,290 रुपये भाडे देण्याची ऑफर दिली, परंतु तिच्या बॉसने नकार दिला आणि तिच्याकडून फक्त पाणी आणि वीज बिलांची रक्कम घेतली.
याआधी ती तिच्या बॉसच्या घरी राहात होती. तिने सांगितले की, दार नसल्याने तिला तिथे झोपायला सोयीचे वाटत नव्हते, याउलट तिला बाथरूममध्ये झोपायला अधिक आवडेल. बातम्यांनुसार, यांगने बाथरूममध्ये स्टॉलवर एक मोठा कपडा टांगला आहे आणि एक फोल्डिंग बेड बसवला आहे जो प्रायव्हसी राखण्यासाठी देखील काम करतो. ती तिचे सामान कापडाच्या रेलिंगवर ठेवते आणि बाथरूममध्ये स्वयंपाक करण्यासाठी ती पोर्टेबल हॉब देखील वापरते. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की यांग दर महिन्याला 34,570 रुपये कमावते. असे असूनही, ती तिचा मासिक खर्च केवळ 4,500 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवते आणि उर्वरित पैसे वाचवते. तिने चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या दैनंदिन जीवनातील काही क्लिप देखील शेअर केल्या आहेत, जिथे तिचे 16 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यांग म्हणाले की, बाथरूममध्ये पर्सनल गोष्टी पाहून ग्राहकांना त्रासदायक वाटते, परंतु ते कोणतेही प्रश्न विचारत नाहीत. यांग म्हणाली की ती तिच्या कामाच्या ठिकाणच्या जीवनशैलीवर आनंदी आहे आणि एक दिवस स्वत:साठी घर किंवा कार खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे वाचवेल अशी आशा आहे.