धक्कादायक! अवकाशात उडताना दिसली रहस्यमयी सावली; पाहून सर्वांनाच बसला धक्का, कुणी म्हटलं, चेटकीण तर कुणी म्हटलं... Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला कधीही काहीही दिसू शकतं. बऱ्याचदा आपण विचारही केला नसेल अशा गोष्टी आपल्याला इथे दिसू लागतात आणि आताही असेच काहीसे घडले आहे. इंटरनेटवर नुकताच एक धक्कादायक आणि सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात अवकाशात एक रहस्यमयी व्यक्ती उडताना दिसून आली आहे. पांढऱ्याशार अवकाशात काळ्या रंगाने भरलेले ते दृश्य सर्वांनाच थक्क करून गेले. माहितीनुसार, हा व्हिडिओ फ्रान्सचा असल्याचे सांगितले जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, अवकाशात एक विचित्र काळ्या रंगाची व्यक्ती उडत असल्याचे आणि हळूहळू वर जात असल्याचे दिसून येते. ढगांमध्ये सावलीत कंपन होतानाही यात दिसुन येत आहे. यामुळेच ही गोष्ट रहस्यमय बनते. असे म्हटले जात आहे की हा व्हिडिओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी बनवण्यात आला होता. @scaryencounter नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यातील दृश्यांनी सर्वांनाच कोड्यात टाकून ठेवलं आहे. अवकाशात उडणाऱ्या या आकृतीला पाहून कोणी तिला चेटकीण म्हणत आहे तर कुणी ड्रोन तर कुणी युएफो असल्याचे म्हणत आहेत. परंतु व्हिडिओतील ही दृश्ये मात्र शेवटपर्यंत सर्वांसाठी गूढ बनून राहिली. अवकाशात उडणारी ती काळी दृश्ये नक्की कसली आहेत याचा खुलासा कुणालाही झाला नाही पण याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
काहीजण व्हिडिओतील दृश्ये पाहून घाबरली तर काहींनी व्हिडिओकडे विनोदप्रमाणे पाहिलं. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे एक ड्रोन आहे ज्यावर डायनचा पोशाख आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या स्त्रीला शांततेत उडू द्या” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे फार विचित्र दिसत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.