(फोटो सौजन्य: X)
जंगलात शिकारीचे अनेक थरार नेहमीच रंगत असतात. इथे जगायचं म्हटलं की शिकार करणं किंवा इतर शिकाऱ्यांपासून स्वतःच संरक्षण करणं गरजेचं आहे. अशात या प्रयत्नात एक हिरण मात्र हरल्याचे दृश्य आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आलं. जंगलाचा धोकादायक शिकारी अजगर भल्यामोठ्या अजगराची शिकार करताना व्हिडिओत दिसून आले, दृश्य इतके भयाण होते की ते पाहून लोक अचंबित झाले आणि वेगाने व्हिडिओला शेअर करू लागले. आता अजगराने हरणाची शिकार केली खरी पण तरीही त्याला हरणाची चव काय चाखता आली नाही, आता असं का घडलं? चला जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
नुकताच व्हायरल होत असलेल्या शिकारीच्या या व्हिडिओमध्ये, शक्तिशाली अजगराने हरणाच्या संपूर्ण शरीराला विळखा घातल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अजगराने प्रथम मोठ्या प्राण्याला आपल्या मुठीत धरले आणि ते गिळण्याच्या बेतात असतानाच हरण गुदमरून मरून गेला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी आधीच मृत असलेल्या हरणाला अजगरापासून वेगळे केले. ज्यानंतर हरणाला जमिनीत पुरण्यात आले. यामुळेच शिकार करूनही अजगराला हरणाला खाता आले नाही. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अजगराने एका झुडपात हरणवर हल्ला चढवल्याचे दिसून येते.
कालागढ़ के जंगल में विशालकाय अजगर ने हिरन को मार डाला हालांकि वह इस को निगल नहीं पाया कारण कि वन कर्मियों ने उसे छुड़ा कर दफन कर दिया!
अब सवाल यह है कि वन कानून के अनुसार जंगल के कानून में हस्तक्षेप नहीं किया जा सकता तो वन कर्मियों ने बड़ी मुश्किल से हाथ आये अजगर के भोजन को छीन… pic.twitter.com/j54m10jhmC
— bhUpi Panwar (@askbhupi) September 12, 2025
शिकारीचा हा व्हिडिओ @askbhupi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कालागड जंगलात, एका महाकाय अजगराने एका हरणाला मारले पण वन अधिकाऱ्यांनी ते वाचवले आणि पुरले म्हणून तो ते गिळू शकला नाही. आता प्रश्न असा आहे की वन कायद्यानुसार वन कायद्यात कोणताही हस्तक्षेप होऊ शकत नाही, म्हणून जर वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने मिळवलेले अजगराचे अन्न हिसकावून घेतले आणि हरणाला वाचवू शकले नाहीत, तर ते पुरून त्यांनी काय कर्तव्य बजावले?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.