बापरे! महिलेच्या कानात घुसला साप, शेपटी आत अन् तोंड बाहेर... भयानक दृश्ये पाहूनच भरेल धडकी; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. इथे अधिकतर अशा गोष्टी जास्त व्हायरल होतात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसावा. आताही इथे असाच एक थराराक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे, यातील दृश्ये इतकी भयाण आहेत की ती पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एका मुलीच्या कानात एक लहान साप गेल्याचे दिसून आले आहे. नक्की यात काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला यात स्पष्ट दिसेल की, एका महिलेच्या कानात छोटासा साप आत घुसून बसला आहे. यावेळी त्याचे डोके कानाच्या बाहेर असून बाकीचे शरीर कानाच्या आत अडकल्याचे समजत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी ज्या प्रकारे त्रस्त आहे ते खूपच भयानक आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलीच्या कानात साप आहे आणि एक डॉक्टर त्याला काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक छोटा साप मुलीच्या कानात शिरल्याचे पाहायला मिळत आहे. मुलीला हालचाल जाणवू लागल्यावर ती वेळ न दवडता डॉक्टरांकडे उपचारासाठी जाते. या काळात डॉक्टर ते काढण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओमध्ये मुलगी वेदनांनी ओरडतानाही ऐकू येते. साप कानात शिरला तर वेदना होऊन प्रकृती बिघडू शकते हे उघड आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये साप मुलीच्या कानाला चिकटल्याचे दिसते.अशा स्थितीत डॉक्टर मुलीला बसवतात आणि हळूच तिच्या कानातून साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतात. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की डॉक्टरांनी हातावर ग्लोव्ज घातले आहेत आणि चिमट्याने सापाला पकडत ते त्याला कानाबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @shilparoy9933 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिच्या कानात किती मोठे भोक आहे टोटल फेक व्हिडिओ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हा साप बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे की आत जाण्याचा प्रयत्न करत आहे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.