(फोटो सौजन्य: Twitter)
आजच्या काळात, बहुतेक लोक सोशल मीडियाचा वापर रील्स पाहण्यासाठी नाही तर रील तयार करण्यासाठी आणि पोस्ट करण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे प्रसिद्ध होण्यासाठी वाटेल ते करू पाहतात. अनेक लोक त्यांच्या अनोख्या कंटेंटमुळे व्हायरल आणि प्रसिद्ध झाले आहेत. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर हा सर्व प्रकार तुम्ही सोशल मीडियावर जवळून पाहिला असेल. अनेक लोक इथे आपल्या अंतरंगी कंटेंटमुळे व्हायरल होतात.
याचबरोबर इथे काही अपघाती घटनाही शेअर केल्या जातात. आपल्या नकळत जेव्हा कोणती गोष्ट घडते आणि आपल्या ती थक्क करून जाते अशाप्रकारच्या अनेक घटना इथे शेअर होतात आणि व्हायरल देखील होतात. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्यातील चित्तथरारक दृश्ये आता सर्वांना आवाक् करत आहेत.
चिमुकल्या हत्तीवर हल्ला करताच आईने असा धडा शिकवला की… उलटे पाय धरूनच पळू लागली मगर; Video Viral
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक एकत्र उभे असून कोणत्या तरी गोष्टीचे सेलिब्रेशन करताना दिसून येत आहेत. त्यांच्यासमोर एक केक ठेवला जातो आणि केकच्या वर क्रॅकर ठेवला जातो. मेणबत्त्याऐवजी, मुलगी हा क्रॅकर पेटवते. आजकाल केकवर असे क्रॅकर लावले जातात, यातून येणारा तेजमय प्रकाश अनेकांना फार आवडतो ज्यामुळे याला केकवर लावले जाते. आता इथपर्यंत सर्व ठीक असते मात्र पुढच्याच क्षणी मागे उभे असलेले काही लोक केकवर फोमचा वर्षाव करू लागतात. यामुळे क्रॅकरमधील आग आणि फोम एकत्र मिळून रिअॅक्शन घडते आणि तिथे एक जोरदार स्फोट होतो. हा स्फोट इतका जबरदस्त असतो की यामुळे केकचे संपून तुकडे होतात आणि ते संपूर्ण घरभर पसरतात. ही घटना आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्ये आता अनेकांना अचंबित करत आहेत.
लगता है केक अब्दुल की फैक्ट्री से मंगवाया था 😂😂. pic.twitter.com/NYVEt42jiD
— Weapon. (@sk465g) February 15, 2025
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @sk465g नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,’ असे वाटत आहे अब्दुलच्या कारखान्यातून केक मागवला होता.’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “व्वा! एवढा आनंद झाला की केकसह धमाका केला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “से फटाके केकवर लावू नका, नाहीतर आनंदाचे रूपांतर दुःखात होईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.