(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळे व्हिडिओ शेअर होत असतात. इथे कधी जुगाड संबंधित व्हिडिओ शेअर होतात तर कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडिओ शेअर केले जातात. तसेच सोशल मीडियावर बऱ्याचदा विवाहसोहळ्यातील व्हिडिओ देखील शेअर होतात. हे व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करतात. लग्नसोहळ्यादरम्यान अनेक अनपेक्षित घटना घडतात. यातच बऱ्याचदा काही अशा घटना ही घडतात ज्या पाहून आपल्याला हसू फुटेल. आताही सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत असेच काहीसे घडल्याचे समजत आहे. यातील दृश्ये इतकी हास्यास्पद आहेत की ती पाहून तुम्ही पोट दुखेस्तोवर हसाल.
काय घडले व्हिडिओत?
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसताना तुमचे पोट दुखायला लागेल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लग्नाची एक रंजक घटना पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये वधू-वर स्टेजवर उभे राहून त्यांचे फोटो क्लिक करत आहेत. दरम्यान कॅमेरामन वधूचे फोटो काढू लागतो. फोटो काढणारा कॅमेरामन वधूला वारंवार पोज देण्यास सांगत होता. अशा स्थितीत तो या बहाण्याने वधूला वारंवार स्पर्श करत होता.
इथे काही काळ नाटक सुरूच राहते. पण जेव्हा कॅमेरामनची कृती वाढते तेव्हा समोर उभा असलेला वराला त्याची कृती पाहून राग येतो आणि लगेचच कॅमेरामनच्या डोक्यावर जोरदार चापट मारतो. वराची ही मारहाण पाहून वधूचेही नियंत्रण सुटते आणि ती स्टेजवरच खळखळून हसू लागते. ही संपूर्ण घटना तेथिल एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये आता सर्वांचे मनोरंजन करत असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
चिमुकल्या हत्तीवर हल्ला करताच आईने असा धडा शिकवला की… उलटे पाय धरूनच पळू लागली मगर; Video Viral
लग्नसमारंभातील हा व्हिडिओ @punjabi_industry__ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वराने योग्य केले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप वाईट परवानगीशिवाय दोनदा त्याने उगाच टच केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.