पोलिसांचेच हे हाल तर सामान्यांचे काय...! भररस्त्यात तरुणाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, पुण्यातील धक्कादायक Video Viral
शिक्षणाचे माहेरघर मानले जाणारे पुणे आता पूर्वीसारखे राहिले नाही, याचे दाखले आपल्याला दररोज होणाऱ्या घटनांतून मिळत आहेत. गेल्या काही काळापासून पुण्यात गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढले आहे. अशा या वाढत्या गुन्ह्यांमुळे पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे कधी एखादा तरुण तरुणीचा भर रस्त्यात खून करतो, तर कधी कोयता गँग खुलेआम दहशत माजवते. एखादा गुंड तुरुंगातून येतो तर त्याची मिरवणूक काढली जाते. या सर्व घटना आता पुण्यात सामान्य झाल्या आहेत.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आता अआणखीन एका घटनेचा समावेश झाला आहे. पुण्यातील आणखीन एक संतापजनक घटना नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजत आहे. यात एक तरुण भररस्त्यात चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला झोडपताना दिसून येत आहे. ही घटना पुण्यातील मगरपट्टी परिसरात घडून आली. याचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आणि आता हाच व्हिडिओ सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात.
प्रकरण काय आहे?
तर पुण्यातील मगरपट्टा परिसरात शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास तरुणाकडून एक पोलीस कर्मचाऱ्याला भररस्त्यात मारहाण करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान स्थानिकांनी युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र याचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर होताच आता व्यक्तीबाबत संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने लोक सोशल मीडियावर आक्रोश व्यक्त करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण मद्यधुंद अवस्थेत मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. तसेच रस्त्यावरून जात असलेल्या अनेकांवर तो दगडफेक देखील करत होता. दरम्यान, या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांनी त्या तरुणाला असे करताना पाहिले आणि त्याला या गोष्टीसाठी हटकावले. वाहतूक पोलिसांनी असे करताच तरुणाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर जमावाने तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पुण्यात वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल #pune #viralvideo #म pic.twitter.com/VXVYdwjBqq
— Harish Malusare (@harish_malusare) January 11, 2025
दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @harish_malusare नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुण्यात वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून बऱ्याच लोकांनी घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले, “मारहाण करणे बरोबर नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे आता अतीच झाले.. याची भररस्त्यातून धिंड काढा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.