(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नुकताच एका मनोरंजक पण तितक्याच थरारक अशा एका लढतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सिंह आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष दिसून आला. मुख्य म्हणजे ही ;लढत कोणत्या जंगलात घडली नाही तर चक्क झाडावर घडून आली, ज्यामुळे हा सामना आणखीनच खास बनला. जंगलात स्पर्धा करताना सामर्थ्य आणि चपळता दोन्ही महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या चकमकीत दोघांनीही आपल्या ताकदीचा आणि चपळाईचा पुरेपूर वापर केला. व्हिडीओमध्ये सिंहीण आपले भक्ष्य पकडण्याचा प्रयत्न करत होती, तर बिबट्याने आपल्या चपळाईने आणि वेगाने तिला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.
ही चकमक आणखी रोमांचक बनली जेव्हा दोन्ही प्राणी झाडावर चढून एकमेकांना लढत देऊ लागले. सिंह सहसा जमिनीवर आपले भक्ष्य पकडतात, परंतु झाडावरील या चकमकीवरून हे दोन्ही प्राणी आपली शक्ती आणि धूर्तपणा कसे दाखवत होते हे दिसून येते. सिंहीण आपल्या विशालतेने आणि ताकदीने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती, तर बिबट्याने आपल्या चपळाईचा वापर करून सिंहीणचे हल्ले टाळले. अशा प्रकारची लढाई पाहणे केवळ मनोरंजकच नव्हते तर जंगलात प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतींचा अवलंब करतो हे देखील यातून दिसून येते. नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
काय घडले व्हिडिओत?
व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, सिंहिणीची ताकद बिबट्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती, मात्र बिबट्या आपल्या चपळाईमुळे सिंहीणीचा हल्ला टाळण्यात यशस्वी होतो. सिंहिणीचे सामर्थ्य आणि प्रभावी हल्ला हे बिबट्यासाठी मोठे आव्हान होते, परंतु तिच्या तत्परतेने तिला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. या संपूर्ण चकमकीत बिबट्याने हे सिद्ध केले की जंगलात केवळ ताकदच नाही तर चपळताही खूप महत्त्वाची असते. शेवटी बिबट्या आपल्या चपळाईने झाडावरून सुखरूप निसटतो. या संपूर्ण लढ्यात हे सिद्ध होते की जंगलातील प्रत्येक प्राणी त्याच्या वैशिष्ट्यांनुसार स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग शोधतो. सिंहीण आपल्या ताकदीच्या जोरावर शिकार करण्यात पटाईत आहे, तर बिबट्या आपल्या वेग आणि चपळाईने मोठ्या भक्षकांपासून पळून जाण्यात यशस्वी होतो.
That leopard bounced off the floor like a ping pong ball 😂 pic.twitter.com/J1GaWVsEGd
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) January 9, 2025
सिंहीण-बिबट्यामधील या मजेदार लढतीचा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘तो बिबट्या पिंग पाँग बॉल सारखा जमिनीवरून उसळला’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून बऱ्याच जणांनी यावर कमेंट्स करत या लढतीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले, “ते झाडावर गेले कसे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्ग हा निसर्गासाठीच बनला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.