आवरा हिला! तरूणीचा बसमधून उतरून प्रवाशांसमोर विचित्र डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात की पाहून आश्चर्य वाटते तर अनेकदा असे विचित्र पण हास्यास्पद व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या लोकांना रिल बनवण्याचा रोग लागला आहे. अनेकजण इतके विचित्र विचित्र स्टंट करतात की अशा लोकांना काय बोलावे ते समजत नाही. टॅलेंटच्या नावाखाली लोक काहीह करत असतात.
सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका तरूणीचा असून नेटकऱ्यांनी हिला चांगलेच ट्रोल केले आहे. अतर अनेकांनी या व्हिडिओची मजा घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही. या तरूणीने इतका विचित्र डान्स केला आहे की, तुम्हाला व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही. मात्र प्रत्यक्षात असा डान्स तुम्हाला पाहू वाटमार नाही.
प्रवाशांसमोर तरूणीचा विचित्र डान्स
व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बस एका बस स्टॉपवर येते. बस थांबल्यावर त्यातून एक तरूणी खाली उतरते. ती उतरून उडी मारून बससाठी थांबलेल्या प्रवाशांजवळ उडी मारते. मात्र काही सेकंदातच ती वेड्या वाकड्या पद्धतीने डान्स करू लागते. तीचा डान्स पाहू तिथे उभे असलेले प्रवासी हसू लागतात. तर काहीजणण तिच्याकडे हैराण होऊन बघत असतात. तर अनेकजण तिच्या अशा वागण्यामुळे विचित्र बघत असतात. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्वत: तरूणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर seemakanojiya87 शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आवरा हिला! आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, एवढा वेळ कसा मिळतो यांना. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की टॅलेंटच्या नावाखाली काहीही करतायत आजकालचे लोक. तर अनेकांनी व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.