फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे आश्चर्यकारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेकदा इतके किळसवाणे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून उलटी येईल. सध्या असाच एक व्हिडिओ विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
क्रिएटीव्हिटीच्या नावाखाली लोक काय करतील हे सांगणे कठीण आणि. काहीजण अशा गोष्टी बनवतात की त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत तर काहीजण असे काहीतरी करतात की हसावे की रडावे कळत नाही. असाच काहीसा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. एका व्यक्तीने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर मॅगी बनवलेली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
डोक्यावर मॅगी बनवून थेट खाल्ली
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ग्राहक नाईच्या खुर्चीत बसलेला दिसत आहे. तर नाव्ही त्याचे केस कापत आहे. नाव्हॅने त्याच्या डोक्यातमध्ये एक गोल आकार केला आहे. मग तो ग्राहकाच्या डोक्यावर पाणी टाकतो. नंतर त्यामध्ये मॅगी ठेवतो आणि मसाला टाकतो. त्यानंतर त्याच्या डोक्यावर ॲल्युमिनियम फॉइल लपेटतो. नंतर तो फॉइलला फायर मशिनच्या साहाय्याने आग देऊन मॅगी शिजवातो. थोड्या वेळाने मॅगी तयार होते. मग तो ती ग्राहकाच्या केसांवरून काढून थेट खायला सुरुवात करतो.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sagarbhaupandit या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनकांनी संतप्त अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत तर काहींनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हे डँड्रफ फ्लेवर्ड मॅगी असेल. तर दुसऱ्या एका युजरने ‘आता केसांवर ऑम्लेट बनवून दाखवा! असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, याच्या भंगार क्रिटीव्हीला कोणतरी पुरस्कार द्या रे. तर अनेकांनी अन्नाचा आपमान होत आहे असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी आरोग्यासाठी अशा प्रयोगांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.