फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहून हसू आवरणे कढी होऊन जाते. कधी जुगाड, स्टंट भांडण तर कधी मजेशीर डान्स रील्स सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक विचित्र पण मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उत्तरप्रदेशात ही अनोखी मजेशीर घटना घडलेली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेली आहे. एक नशेत धुंद असलेल्या व्यक्तीने 25 ग्रॅम बटाट्याच्या चोरीसाठी थेट पोलिसांना बोलावले आहे. विशेष, म्हणजे पोलिस त्याच्या घरी चौकशीसाठी जातात. त्यांच्या चौकशीचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणे कठीण होईल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिस अधिकारी या नशेत धुंद व्यक्तीशी संवाद साधत आहेत. ते त्याला विचारत आहे की कशाची चोरी झाली आणि कशी चोरी झाली. यावर तो व्यक्ती म्हणतो. की, त्याने बटाटे स्वयंपाकासाठी काढले होते, पण कामानिमित्त थोडावेळ बाहेर जाऊन आल्यानंतर त्याला बटाटे गायब असल्याचे आढळले. म्हणून लगेच 112 वर फोन करत चोरीची तक्रार नोंदवली. आता त्याची चौकशी करा असे त्याचे म्हणणे आहे. या घटनेची गंमत पोलिसांना रेकॉर्ड केली आहे. तो व्यक्ती म्हणतो की, “हो, मी दिवसभर मेहनत करतो, आणि थोडी वाईन पितो. पण हे प्रकरण वाईनचं नाही, बटाट्यांचं आहे!” त्याने मद्यधुंद अवस्थेत बटाट्यांची चोरी किती गंभीर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हायरल व्हिडिओ
विजय वर्मा के 250 ग्राम आलू चोरी हो गऐ।
#पुलिस जाँच करे और दोषी कों शीघ्र पकड़े। pic.twitter.com/8TtqHWxy1k— Dennis The Menace (@Dennis0D0Menace) November 2, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील व्यक्कीचे नाव विजय वर्मा असल्याचे सांगतिले आहे. याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्व सोशल मीडियावर हशा पिकला आहे. अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर अशा प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका यपजरने म्हटले आहे की, भाऊ, मामला गंभीर आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याचे बटाटे त्याला मिळालेच पाहिजेत. तिसऱ्या एका युजरने यावर हसण्याचे इमोजी शेअर करत म्हटले आहे की, पोलिसांचे काम आहे मग ती गोष्ट छोटीशी का असेना. मात्र काहींनी आपत्कालीन सेवांचा अशा प्रकारे गैरवापर झाल्याबद्दल टीका केली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Dennis0D0Menace या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.