वय फक्त नंबर! पेंशन घ्यायच्या वयात आजोबांना बॉडी बनवायचं टेंशन! जीममधला जबरदस्त जोश पाहून तरुणही झाले फेल... पहा Viral Video
लग्नाच्या एंट्रीमध्ये आला व्यत्यय! बच्चे कंपनीला दिलं ढकलून आणि… पुढे काय घडलं? पहा Viral Video
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक आजोबा जीममध्ये गेले आहेत आणि दोन जड डम्बल उचलून एका फ्लॅट बेंचवर झोपले. यावेळी त्यांचा बॅलेंस काहीसा बिघडल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आजोबांचा बॅलेंस बिघडल्याचं पाहून जिममधील एक व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी येत असतो. मात्र त्यापूर्वीच आजोबा स्वत:ला सावरतात आणि व्यायामाला सुरुवात करतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आजोबा बेंचवर झोपून डम्बल प्रेसची एक्सरसाइज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ AI द्वारे तयार करण्यात आला आहे की हा खरंच एखाद्या जीममधील व्हिडीओ आहे, हे सांगणं कठीण आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
ऐश्वर्या रायचा धर्म अन् नाव बदलून करणार लग्न; पाकिस्तानच्या मौलवीने ओकली गरळ, VIDEO VIRAL
इंस्टाग्रामवर baklolhuyaar नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी कमेंट केली आहे. एका यूजरने लिहीले आहे की, हा AI व्हिडीओ आहे. तर दुसरा यूजर म्हणाला आहे की, शेजारच्या काकूंनी काकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे वाटतं. एका यूजरने म्हटलं आहे की, काका आमच्या जिम ट्रेनरपेक्षा चांगली एक्सरसाइज करत आहेत. आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, पेन्शनचे संपूर्ण पैसे व्हे प्रोटीनसाठी जातील.






