American man eat Modak for First time video viral
आज गणेश चतुर्थी. देशभरात आज सर्वत्र गणपती बप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण आहे. याच वेळी बप्पाला आवडणारे मोदकही सर्वत्र चर्चेत आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातीही बप्पाची आणि मोदकची क्रेझ आहे. सध्या एक अमेरिकन व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्यक्तीने पहिल्यांदाच मोदकाचा अस्वाद घेतला आहे. त्यानंतर त्याने जी रिॲक्शन दिली आहे, तीही जबरदस्त आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भारतीयांच्या पसंतीस पडत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @dishakpansuriya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध व्यक्ती हातात मोदक घेऊन उभा आहे. तो पहिल्यांच मोदक खात आहेत. तुम्ही पाहू शकता की, मोदक खाल्यानंतर व्यक्तीने जबरदस्त रिॲक्शन दिली आहे. मोदक खाऊन या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. मोदक खाऊन तो संतुष्ट झाल्याचे दिसून येते. हा व्यक्ती अमेरिकन असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
यापूर्वी नायजेरियातील मुलांचा गणपती बप्पाच्या देवा श्री गाण्यावर डान्सचा एक व्हिडिओ (VIDEO)व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ देखील लोकांना खूप आवडला होता. यावरुन परदेशातही बप्पाची क्रेझ आहे हे दिसून येते.
धक्कादायक! मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक भारतीयांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भावला खाताना पाहून मला आनंद होत आहे, तर दुसऱ्या एका युजरने किती क्यूट रिॲक्शन आहे, असे म्हटले आहे. आणखी एका युजरने हीच तर भारतीय संस्कृती आहे, परदेशींनाही आपली बनवून टाकते असे म्हटले आहे. आणखी एकाने गणपत्ती बप्पा मोरया असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
डॉगेश भाईचा जंगलात दरारा! कुत्र्याने भूकंताच सिंहीणीने ठोकली धूम, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.