अरे बापरे! अवकाशात उडणाऱ्या पक्ष्याचे पोट फाडून बाहेर आला ईल मासा, आश्चर्यकारक दृश्यांनी सर्वच हादरले अन् थरारक Video Viral
सोशल मीडियावर अनेक अनोखे आणि नवनवीन व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हादरवतात कधी थक्क करतात तर आश्चर्याचा धक्का देऊन जातात. लोक इथे व्हायरल होण्यासाठी अनेक विचित्र प्रकार देखील शेअर करतात मात्र आता एक धक्कादायक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आले आहे ज्यातील दृश्यांनी तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. यात अवकाशातील एक रोमांचक दृश्य दिसून आले ज्याला पाहून सर्वच हादरले. चला यात नक्की काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
वास्तविक, सोशल मीडियावर प्राण्यांचेही बरेच व्हिडिओ शेअर केले जातात. प्राण्यांमधील थरारक लढत इंटरनेटवर नेहमीच एक रंजक आणि आवडीचा विषय असतो. अशात एका असाच शिकारीनंतरचे भयाण दृश्ये आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. त्येक सजीव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दुसऱ्या सजीवाचे अन्न बनतो. जसे साप उंदरांची शिकार करतो आणि गरुड सापांची शिकार करतो. पण कधीकधी शिकारी देखील शिकार बनतो. निसर्गाच्या या अद्भुत चमत्कारावर विश्वास ठेवणे जरा कठीण आहे मात्र फोटोग्राफरने शेअर केलेला व्हिडिओ अगदी खरा आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक पक्षी अवकाशात उडत असल्याचे दिसते मात्र तो एकटाच नाही त्याच्यासोबत एक ईल मसाही असतो जो नुकताच त्याच पोट फाडून बाहेर आलेला असतो. पक्ष्याने काही वेळेपूर्वीच या ईल माशाला गिळले होते मात्र फोटोमध्ये असा दावा करण्यात आला आहे की शेकडो फूट उंचीवर उडणाऱ्या या पक्ष्याचे पोट फाडून ईल मासा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर एका छायाचित्रकाराने हे विलक्षण दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, जे आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
A photographer has captured the incredible moment an eel escaped from heron’s stomach while the bird was still in flight. pic.twitter.com/PK5LMVUbF4
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) December 27, 2024
दरम्यान हा व्हायरल फोटो @AMAZlNGNATURE नावाच्या एक्सा अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 35 मिलियनहुन अधिकच्या व्युज मिळाल्या असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या अद्भुत दृश्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “म्हणून तुमचे अन्न चावून खा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अन्न खाण्याआधी त्याला पूर्णपणे मारू टाकले पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जेवण शिजवून खा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.