डॉक्टर: काळजी करू नका पांडे…. हे खूप छोटे ऑपरेशन आहे
रुग्ण: धन्यवाद डॉक्टर, पण माझे नाव पांडे नाही तर माझे नाव राजेश आहे
डॉक्टर: मला माहित आहे….. पांडे माझं नाव आहे
पेशंट: विचित्र आजार झाला आहे, मला जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो, मी काय करू?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा
महिला : डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय
डॉक्टर : मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
महिला : पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कॅन करायची काय गरज डॉक्टर ??
दीर्घ आजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात
डॉक्टर : आधी कोणत्या डॉक्टरकडे गेला होतात ?
अण्णा : डॉ. देशपांडे
डॉक्टर : अहो तो देशपांडे डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतो. तुम्हाला कोणता सल्ला दिला ?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा
डॉक्टर : तुमचं वजन किती ?
रुग्ण : चष्मा धरून साठ किलो
डॉक्टर : आणि चष्म्याशिवाय ?
रुग्ण : दिसतच नाही हो
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्णः बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते
रुग्ण : तुम्हाला टाके घालता येतात का?
डॉक्टर : हो येतात कि, कशाला घालायचे आहेत?
पिंट्या : हे बघा चप्पल. याचा बटन तुटला आहे, जरा ठीक करून द्या बर.
रुग्ण : मी झोपतो तेव्हा माझ्या स्वप्नात माकडे फुटबॉल खेळतात
डॉक्टर: काही हरकत नाही, रात्री झोपण्यापूर्वी ही गोळी घ्या.
रुग्ण : मी उद्यापासून घेईन, आज शेवटचा दिवस आहे.
रुग्ण : मी खूप अशक्त आहे.
डॉक्टर : सालासहित फळे खा.
एक तासानंतर रुग्ण: डॉक्टर साहेब! माझ्या पोटात खूप दुखत आहे.
डॉक्टर: तुम्ही काय खाल्ले?
रुग्ण: खोबरं सोलून खा.
रुग्ण: डॉक्टर साहेब, प्रिस्क्रिप्शनवर पहिले औषध कोणते आहे?
डॉक्टर: हे औषध नाहीये, मी फक्त पेन वापरून पाहत होतो चालतोय की नाही ते…
Web Title: Read funny doctor patient jokes in marathi