
Arunachal Pradesh biker survives landslide video viral
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या लोअर सियांग जिल्ह्यातील सिजी भागात ही घटना घडली. भारतामध्ये मान्सूनच्या मुसधळधार पावसामुळे ईशान्य भारतात हाहाकार माजला आहे. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातील रस्ते आणि माती अत्यंत ठिसूळ झाली आहे. यामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक दुचाकीस्वार चिखलाने माखलेल्या अरुंद डोंगराळ भागातून आपली गाडी अत्यंत सावधगिरीने पुढे घेऊन जात आहे.
पण याच वेळी अचानक रस्ता एका बाजूवे पूर्णपणे कोसळू लागतो. यामुळे तरुणही त्यासोबत वाहत जातो.अवघ्या ५ ते ६ सेंकदात झाडे, दगड, आणि मातीच्या ढिगाऱ्यासोबत तरुणी नदीच्या पात्रात पडतो. हा अपघात एवढा भयंकर होता की, तरुणाचा जीव वाचणेही कठीण होते. पण आश्चर्याची बाब म्हणेज, एवढ्या उंचावरुन कोसळल्या नंतरही तरुणला काही होत नाही. या भयानक दुर्घटनेतून तरुण सुखरुप वाचतो.
Hair raising video from Arunachal Pradesh shows a biker riding a landslide (28.06.2026) Amidst incessant rains across NE India, a video from Siji, Lower Siang shows a landslide carrying a biker down with it & blocking the Siji River. Luckily, the biker escaped unharmed. He… pic.twitter.com/ypRiZRQjQJ — Kyang Thang རྐྱང་ཐང་ (@Kyangs_Thang) June 28, 2026
सध्या या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Kyangs_Thang या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. एका नेटकऱ्याने जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती म्हणून कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एकाने काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशा प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.