लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्रेनमधीलच एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला सतत काही ना काही खात होती. खाल्ल्यानंतर अन्नाचे तुकडे, फळांच्या साली आणि प्लास्टिकचे पॅकेट्स तिने सीटखालीच टाकले. तिने त्याच ठिकाणी हातही धुतला. व्हिडिओतही स्पष्ट दिसत आहे, सीटच्या खाली, आजूबाजूला कचरा पडला आहे. महिला पाण्याची बॉटल काढून हात धुवत आहे. कोचच्या अगदी बाहेरच्या बाजूलाच डस्टबिन असूनही तिने उठायचे कष्ट घेतलेले नाहीत.
देखिए ..
ट्रेन के सीट पर बैठ कर ये महिला कैसे गंदगी फैला रही है,खा ली,पानी पी ली, हाथ भी धो लिया,
सिर्फ़ सीट पर बैठे बैठे हल्का होना बाकी है.. pic.twitter.com/p5QiwAlKT9 — Ritu Priya (@iRitupriya_) June 27, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @iRitupriya_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, सिविक सेन्सची पूर्ण धज्जीया उडवली हिने. तर दुसऱ्या एकाने सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, पण अशा लोकांमुळे देशाचे नाव खराब होते असे म्हटले आहे. अनेकांनी महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






