Pakistani fans reaction after losing to India
रविवारी (२८ सप्टेंबर) दुबईमध्ये झालेल्या आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानचा दाणून पराभव केला. यामध्ये भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हारवले. सध्या यामुळे भारतात आनंदाचे वातावरण आहे. मात्र पाकिस्तानात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. पाकिस्तानी खेळाडूंवर पाकिस्तानी चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर टीकात्मक टिप्पण्या करत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केले आहेत. सोशल मीडिया पासून ते पाकिस्तानच्या रस्त्यांवर लोक उतरले आहे.
पाकिस्तानच्या टीमने भारतासमोर १४७ धावांचे लक्ष ठेवले होते. जे भारताने १९ ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि पाच विकेट्सही घेतल्या. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट कर्णधार सलमान अली आगा आणि वेगवान गोलंदाज हरिस रौफच्या खराब गोलंदाजीवर पाकिस्तानी चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हरिस रौफने केवळ ५० धावा दिल्याने तो चाहत्यांसाठी खलनायक ठरला आहे.
एका पाकिस्तानी नागरिकाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने म्हटले आहे की, आम्हाला उत्तर पाहिजे. आमची लायकी नाहीय भारताला हरवण्याची. भारताने आमचा असा पराभव केला आहे की, आमच्या सात पुष्त्या देखील विसरणार नाहीत. तसेच आपण कधीच भारताला हरवू शकणार नाही असे या चाहत्याने म्हटले आहे. त्याने इंडिया हमारा बाप था, बाप रहेगा अशी प्रतिक्रिया देत, आय लव्ह यू इंडिया असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
• हम लाशें उठा रहे हैं
• हम इंडिया के जूती के बराबर नहीं हैं… Listen to this Pakistani ranting after India thrashed Pakistan yet again, in the #AsiaCup2025 final! 🔥 🏆 pic.twitter.com/ArLltNzKJ0 — SAHIL YADAV (@bjpsahilyadav) September 29, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @bjpsahilyadav या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेक पाकिस्तानी लोकांनीच संताप व्यक्त केला आहे. अगदी पाकिस्तानी महिलांनी देखील त्यांच्या संघावर टीका केली आहे. तसेच पीबीसीच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. सध्या पाकिस्तानमध्ये वातावरण चांगलेच तापलेले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.