शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Tracher Beaten up Stundent : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी संतापजनक घटनांचे व्हिडिओही पाहायला मिळतात. सध्या असाच एक निर्दयी व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्याला कानाखाली मारताना दिसत आहे. त्याचे कान पिळताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हरियाणाच्या पानीपतमधील एका शाळेती आहे. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका ७ वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करताना, एका विद्यार्थ्याला वर्गात उलटे लटकताना दिसत आहे. हे पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. होमवर्क न केल्यामुळे एका विद्यार्थ्याला खिडकीला उलट लटकवण्यात आले आहे, तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांसमोर कानाखाली मारण्यात आले आहे. ही घटना पानीपतच्या एका सिर्जन स्कूलमधील असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच वेळी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी रीना यांनी सफाई देत, ज्या विद्यार्थ्यांना मारण्यात आले त्यांनी दोन मुलींशी गैरवर्तन केले होते. यामुळे त्यांना सुधारण्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तसेच मुख्याध्यापिकांनी दावा केला की, याची माहिती त्यांनी त्यांच्या पालकांना दिलेली होती. परंतु यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलांना चूक झाली तर त्यांना समजून सांगणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे त्यांना मारहाण करणे शिक्षण कायद्याच्या विरोधात असल्याचे लोकांनी म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शाळेवर मुलांना शिक्षा म्हणून शौचालय साफ करण्यासही लावण्यात येते असे सांगितले जात आहे. या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
एकच नंबर…! गरब्यावर चिमुकल्यांचा रंगला अफलातून खेळ; स्टेप्स पाहून नेटकरी हैराण, म्हणाले… Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @indiaonfeed या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त करत स्कूलवर आणि विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवाय मुलांना मारण्याची परवानगी देणाऱ्या पालकांवरही कारवाई व्हावी असे म्हटले जात आहे.
IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.