बापरे! कोकिळेचे बाळ भल्यामोठ्या गिरगिटाला गिळू लागले, पाहून आईही थक्क, Viral Video पाहून हैराण व्हाल
आपल्या मधुर वाणीसाठी ओळखली जाणारी कोकिळा अनेकांच्या आवडीची. तिचा मधून आवाज ऐकताच आपले मन प्रसन्न होऊन जाते. तुम्ही कोकिळेला तर पाहिले असेल मात्र तिच्या पिल्लाला कधी पाहिले आहे का? नसेल तर आज तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. पिल्लू म्हटलं की आपल्या मनात पहिले निरागस, लहान, गोड अशी विशेषणे येऊ लागतात. मात्र आज जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात कोकिळेच्या पिल्लाचे एक भयानक रूप पाहायला मिळत आहे. यात हे पिल्लू चक्क भल्यामोठ्या गिरगिटाला गिळताना दिसत आहे. ही थरारक घटना पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक छोटी कोकिळा तिच्या तोंडात गिरगिट घेऊन गिळण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र हा गिरगित त्या लहान कोकिळेहून फार मोठा आहे, त्यामुळे कोकिळेला त्याला गिळताना त्रास होत आहे. दरम्यान, आई कोकिळा आपल्या मुलासाठी एक किडा घेऊन येते, मात्र सामोरील सर्व दृश्ये पाहून तिलाही धक्का बसतो आणि निस्तब्ध होऊन ती सुरवातीला हे सर्व पाहताच राहते. मात्र तो गिरगित त्या पिल्लाच्या तोंडात अडकल्याचे समजताच आई कोकिळा आपल्या पिल्लाला मदत करते आणि तिच्या तोंडातून गिरगिटाला बाहेर काढू लागते.
हेदेखील वाचा – आईच्या जीववर उठला मुलगा, फोन हिसकावताच डोक्यात घातली बॅट, धक्कादायक घटनेचा Video Viral
पण 30 सेकंदांनंतर व्हिडिओचा पहिला भाग संपतो. क्लिपच्या पुढच्या भागात, नवजात पिल्लू आपल्या आजूबाजूला असणाऱ्या तीन निळ्या रंगाच्या अंड्यांना घरट्याच्या बाहेर काढताना दिसत आहे. यावरूनच आपण त्याच्या क्रूरतेचा अंदाज लावू शकतो. दोन्ही भाग वेगळे असले तरी दोन्हीमध्ये पिल्लांच्या क्रूर आणि भयावह रुपाचे दर्शन घडवण्यात आले आहे. दोन्ही व्हिडिओ पाहून आता सर्व युजर्स आवाक् झाले आहेत. चिमुकली पिल्लं इतकी धोकादायक असू शकतात हे पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – धक्कादायक! चिमुकलीच्या अंगावर पडला भलामोठा फ्रिज, अंगावर काटा आणणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @abonashmu नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 1 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देऊन यावर आपली पसंती दर्शवली आहे. तसेच काहींनी यावर कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका युजने लिहिले आहे, “त्याने अजून डोळेही उघडलेले नाहीत पण तो किलर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा किती हुशार आहे यार” आणखीन एका युजरने लिहिले आहे,”कोण कोणाला खायला आला होता हेच कळत नाही”.