Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिबट्याने जबड्यात माकडिणीला पकडलं तरीही मृत आईला बिलगून राहिलं पिल्लू, हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

सध्या प्राण्यांच्या आयुष्याशी निगडित एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात बिबट्याने एका माकडिणीची शिकार केल्याचे दिसून येत आहे. मात्र या मृत आईला तिचे निरागस पिल्लूदेखील तिच्या हृदयाशी बिलगल्याचे दिसून येत आहे. जणू ते आपल्या आईवर संपूर्णपणे अवलंबून आहे. हे भावनिक दृश्य पाहून आता अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2024 | 03:38 PM
बिबट्याने जबड्यात माकडिणीला पकडलं तरीही मृत आईला बिलगून राहिलं पिल्लू, हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

बिबट्याने जबड्यात माकडिणीला पकडलं तरीही मृत आईला बिलगून राहिलं पिल्लू, हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर प्राण्यांच्या जीवनाशी निगडित अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओमध्ये जंगली प्राण्यांमधील लढाई पाहायला मिळते, तर काही व्हिडिओमध्ये एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसतो. मात्र सध्या प्राण्यांच्या दुनियेतील एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील धक्कादायक दृश्ये पाहून तुमचे हृदय पिळवटून निघेल. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण भावुक झाले आहेत. नक्की असे काय आहे या व्हिडिओत? चला जाणून घेऊयात.

काय आहे व्हिडिओत?

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे उगाच म्हटले नाही. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढणारी आई ही जगात पुन्हा पुन्हा मिळत नाही. आई-मुलाचे हे प्रेम फक्त माणसातच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक बिबटा दिसत आहे. यावेळी त्याने आपल्या जबड्यात एका माकडिणीची शिकार केल्याचे दिसून येत आहे. मात्र आश्चर्याची बाब तेव्हा घडते जेव्हा आपण त्या माकडिणीच्या हृदयाशी बिलगून बसलेल्या चिमुकल्या पिल्लाला पाहतो. आपल्या आईसोबत नक्की काय घडलं याची कल्पना नसताना आधारासाठी फक्त तिलाच बिलगून राहणं किंवा तिच्या कुशीत सुरक्षित त्या पिल्लाला सुरक्षित वाटत असल्याने कदाचित त्या स्थितीतही ते पिल्लू त्याच्या आईला बिलगले असावे.

हेदेखील वाचा – गरुडाने मेंढीला हवेत उचलले अन् क्षणार्धात खेळ उलटा पडला, घडलं असं काही की… गरुड आयुष्यभर करेल पश्चाताप

हा व्हिडिओ इतका हृदयस्पर्शी आहे आता हा व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. आपल्या आईच्या मृत्यूची कल्पना नसणाऱ्या त्या पिल्लाच्या निरागसतेकडे पाहून तुम्हाला त्याच्या डोळ्यात प्रेम, माया, भूक, भीती असे अनेक भाव एकाच वेळी दिसून येतील. शिकार हा जंगलाचा नियम असला तरी अशा काही घटना आपल्या हृदयाचे खच्चीकरण करून टाकतात. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजलेले नाही.

हेदेखील वाचा – भररस्त्यात हत्तीला पाहताच रिक्षाचालकाचा तोल ढळला अन् क्षणार्धातच नको ते होऊन बसलं, Video Viral

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @earth.ree नावाच्या इंस्टाग्राम काऊण्टवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, निसर्ग कधी कधी खूप क्रूर असू शकतो असे लिहिले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नाही, क्रूर म्हणून वर्णन करणे ही आपली चूक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप इमोशनल आहे”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप वेदनादायक आहे”.

Web Title: Baby monkey clings to dead mother after leopard attack emotional video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO
1

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
2

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral
3

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral
4

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.