जंगल परिसरातून जाणाऱ्या रस्त्याने वाहन चालवणे काही सोपे काम नाही. यात सर्वात मोठा धोका म्हणजे जंगलातून कधी कोणता जीवघेणे प्राणी समोर येईल याचा नेम नसतो. सावधानतेसाठी बऱ्याचदा अशा रस्त्यांवर वन विभागाकडूनही प्राण्यांपासून सावधान, असे फलक लावलेले दिसतात. कारण अशात प्राण्यांकडे दुर्लक्ष करणे गाडी चालकाला महागात पडू शकते. जंगल वाटेतून वाहन चालवताना चालकाने केलेली एक चूक त्याने चांगलीच महागात पडू शकते. याचेच दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. यात रस्त्याने भरधाव वेगाने रिक्षा चालवता अचानक हत्ती समोर आल्याचे दिसून येत. हत्तीचे असे अचानक समोर आल्याने रिक्षा चालकाचा तोल ढासळतो आणि घाबरतो. भीतीने त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटते आणि दुसऱ्याच क्षणी रिक्षा हत्तीसमोर उलटी होते. हत्तीला पाहून रिक्षाचालकानं रिक्षा बाजूला घेत निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि रिक्षा रस्त्यावर उलटी पडली.
हेदेखील वाचा – जणू दुर्गाच अवतरली! तीन चोरांना एकटीच भिडली महिला, पहा कसे पळवून लावले सर्वांना, Video Viral
रिक्षा उलटी होताच त्यात बसलेले सर्व प्रवासी फार घाबरतात आणि एक एक करून सर्वजण या रिक्षातून बाहेर पडून तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागतात.मुख्य म्हणजे, यात हत्तीला तसेच कोणत्याही प्रवाशाला कोणतीही हानी झाली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ नक्की कुठला हे अद्याप समोर आलेले नाही.
हेदेखील वाचा – इंडिगो फ्लाईटमधील प्रवाशांचा गोंधळ, क्रू मेंबर्सला काढलं बुकलून, धक्कादायक Video Viral
या सर्व घटनेचा व्हिडिओ @wildtrails.in नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “एक किलोमीटर आधी थांबला पाहिजे होता; पण जवळून कटिंग घेण्यासाठी पुढे आला.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला एलिफंट अटॅक नाही, तर पॅनिक अटॅक, असे म्हणतात. ” आणखीन एका युजरने लिहिले, “करण्याआधीच रिक्षा उलटी झाली”.