जमिनीवर सिंह, पाण्यात मगर आणि आकाशात गरुड यापेक्षा याहून मोठा शिकारी कोणी नाही. हे तिघे आपल्या भक्ष्यावर अशा प्रकारे हल्ला करतात की त्यांना स्वतःला वाचवण्याची संधीही मिळत नाही. जर आपण त्यापैकी सर्वात धोकादायक जीवाविषयी बोललो तर यात गरुडाचे नाव प्रामुख्याने प्रथम समोर येईल. कारण गरुड आपल्या भक्ष्यावर दुरून नजर ठेवतो आणि संधी मिळताच तो आपले भक्ष्य पकडतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यातील थरारक दृश्ये पाहून तुमच्या पायाखालची जमीन हादरले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक गरुड उडताना दिसत आहे. यावेळी तो खाली असलेल्या मेंढरांच्या कळपावर निशाणा साधून बसलेला असतो आणि ठरवल्या प्रमाणे तो पुढच्याच क्षणी त्यातील एका मेंढीवर हल्ला करतो आणि मेंढीला घेत उंच अवकाशात भरारी घेतो. आता तो शिकार करत असताना दुसऱ्या एका शिकारीच्या गरुडाने त्याच्यावर नजर टाकली.
हेदेखील वाचा – भररस्त्यात हत्तीला पाहताच रिक्षाचालकाचा तोल ढळला अन् क्षणार्धातच नको ते होऊन बसलं, Video Viral
या व्हिडिओमध्ये, मेंढ्या टेकडीवर इतर साथीदारांसह गवतावर कशा प्रकारे चरत आहेत ते तुम्ही पाहू शकता. पण तो शिकारी गरुडाच्या रडारवर आल्याचे मेंढ्यांना फारसे माहीत नव्हते. काही सेकंदातच गरुड मेंढ्याच्या दिशेने उडतो. गरुडाच्या आगमनाच्या धमकीने मेंढ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यातच गरुड एका मेंढ्याला आपल्या पंज्यात पकडतो आणि अवकाशात उंच भरारी घेतो. गरुडाला मेंढीला एका निर्जन ठिकाणी नेऊन शिकार करायची होती. मात्र जसा त्याने विचार केला होता तसे पुढे घडत नाही. त्याच्यावर यावेळी दुसऱ्या गरुडाची नजर पडते.
हेदेखील वाचा – जणू दुर्गाच अवतरली! तीन चोरांना एकटीच भिडली महिला, पहा कसे पळवून लावले सर्वांना, Video Viral
नंतर व्हिडिओमध्ये दिसते की, दोन्ही गरुडांमध्ये शिकार करण्यावरून भांडण सुरू होते. आणि या भांडणात मेंढी टेकडीवरून खाली पडते आणि क्षणार्धात दिसेनाशी होते. म्हणजेच, दोन्ही गरुडांपैकी एकालाही मेंढी मिळत नाही. या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला गरुडाची थरारक शिकार आणि दोन्ही गरुडांतील जीवघेणी लढत पाहायला मिळते. या घटनेचा व्हिडिओ @sharnuud_anirkhan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तर, असे दिसते की गरुड एखाद्या माणसालाही उचलायला कमी करणार नाही, इतकी शक्ती त्याच्यात आहे”.