
व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
सांगितले जात आहे की, बख्तियारपुर जंक्शनवरील प्लॅटफाॅर्मवर महिला आपली रिल शूट करत होती. व्हिडिओमध्ये महिला प्लॅटफार्म उभी दिसते. यावेळी तिच्या हातात कोल्ड ड्रिंकची एक भलीमोठी बाटली असते. जशी व्हिडिओला सुरुवात होती तशी महिला आपल्या अंगावर ही कोल्ड ड्रिंकची बाटली रिकामी करताना दिसते. तिला असं करताना आजूबाजूची लोक प्रश्नार्थक आणि आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहत राहतात. बाटलीतील संपूर्ण कोल्ड ड्रिंक आपल्या अंगावर ओतल्यानंतर व्हिडिओ बंद होतो. ही घटना व्हायरल होताच आता RPF ने महिलेवर कारवाई करण्यासाठी महिलेचा तपास करायला सुरुवात केली आहे.
अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
तपासादरम्यान व्हिडिओत दिसून आलेल्या महिलेची ओळख वर्षा देवी अशी पटली आहे. महिलेला अटक करण्यात आली असून स्टेशन परिसरात तिने असे अनेक व्हिडिओज शूट केल्याचे समोर आले आहे. रेल्वे कायद्याच्या कलम १४५ आणि १४७ च्या अंतर्गत महिलेवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. लक्षात घ्या, रेल्वेच्या आवारात होणाऱ्या अशा प्रकारच्या कृत्यांना सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयीसंबंधीचे नियम लागू होतात. यामुळेच रेल्वेच्या परिसरात फक्त व्हायरल व्हायचंय म्हणून नको ते प्रकार विचित्र प्रकार करणे टाळा.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.