
Be careful eating and buying food from railway or bus station shocking video goes viral
अनेकदा काही गोष्टी महाग असतात आणि त्यामध्ये काहीच नसते. उदाहरणार्थ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने सॅंन्डविच खरेदी केले आहे. पण ते सॅन्डविच पाहायल्यावर तरुणी हैराण झाली आहे. तिला केवळ ब्रेडच मिळाला आहे. त्यामध्ये टोमॅटो आणि चटणी देखील आहे, पण कमी प्रमाणत. आता ते किती हे तुम्हाला व्हिडिओ पाहून समजेलच. व्हिडिओमध्ये तुम्ही तरुणी सॅन्डविच दाखवताना पाहू शकता. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काही बसेल आणि हसूही आवरणार नाही. शिवाय तुम्ही पुढच्या वेळी रेल्वे स्टेशनवरुन अन्न खरेदी करताना १० वेळा विचारही कराल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @blushnvibe.s या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तरुणीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सॅन्डविचमध्ये चटणी नाही, तर केवळ ग्रीन कलर होता असे लिहिले आहे. तसेच हा व्हिडिओ जुना आहे, परंतु हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी रेल्वे किंवा बस प्लॅटफॉर्मवरुन अन्न खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय यांसारखे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एका व्हिडिओत तर एक व्यक्ती रेल्वेच्या टॉयलेट सीटवर भेळसाठी कांदा आणि टोमॅटो चिरत होता, ज्या व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.