पोलिस आहे की गुंड? ट्राफिक हवलदाराने तरुणाला थेट लगावली कानशिलात; VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतप्त, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन ट्राफिक पोलिसांनी एका तरुणाला पकडले आहे. यातील एक पोलिस तरुणाला कानाखाली मारतो. नेमके कोणत्या कारणावरुन तरुणाला मारण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांनी तरुणाला थांबवले. त्याने हेल्मेट घातले होते. पण तरीही त्याला मारले. याचा व्हिडिओ व्हायरल होताच संबंधित ट्राफिक पोलिसांना निलंबित करण्याक आले आहे. या व्हिडिओवर बंगळुरु लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
“Accountability and respect go hand-in-hand. Action taken against staff for misbehavior” https://t.co/Dlu3pPmhsE — DCP SOUTH TRAFFIC (@DCPSouthTrBCP) October 15, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर @DCPSouthTrBCP या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तरुणाला मारणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी पोलिस अधिकारी त्यांच्या अधिकारांचा गैर-फायदा घेतात असे म्हटले आहे.
लोकांनी या घटनेला जबाबदारी आणि आदराशी जोडले आहे. एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत म्हटले आहे की, हेच जर एका नागरिकाने केले असते तर त्याला तुरुंगात जावे लागले असते असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने गणवेशधारी गुंडागिरी असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने जरी कोणी चुक केली असेल, तर पोलिसांचे काम आधी त्याला समजावून सांगणे आहे, पण हे लोक थेट दादागिरीवर येतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






