Bengaluru Woman’s September Expenses (फोटो सौजन्य- AI)
या मुलीचं नाव शिवांजली आहे. ती बंगळुरूमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत काम करत तिने एक व्हिडीओ बनवला. त्यात तिने लिहिलंय – “सप्टेंबर मधला माझा खर्च. बंगळुरूमध्ये राहणारी 26 वर्षांची कॉर्पोरेट मुलगी “तिने आपल्या व्हिडीओमध्ये एक-एक रुपयाचा हिशोब दिला आहे. भाड्यापासून ते स्विगी पर्यंत सगळं सांगितलंय.
शिवांजली तिच्या कॉलेजच्या दोन मैत्रिणींसोबत एका 3BHK फ्लॅटमध्ये राहते. तिघींमध्ये भाडं वाटलं जातं. तरी पण तिचा एकटीचा वाटा 25 हजार रुपये येतो. यात मेंटेनन्स पण आला. म्हणजे कमवलेल्या पैशातले जवळपास 40 टक्के पैसे फक्त डोक्यावर छत ठेवण्यासाठी जातात. बंगळुरूमध्ये घरं किती महाग आहेत याचा हा पुरावा आहे.
ती सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ऑफिसमध्येच करते. त्यामुळे तिथे तिचे पैसे वाचतात. रात्रीसाठी त्यांनी स्वयंपाकाला घरी एक मावशी ठेवली आहे . त्याचा खर्च सगळ्या मैत्रिणी मिळून देतात. त्यामध्ये शिवांजलीच्या हिस्साला 2 हजार रुपये, तसेच घराला लागणारा किराणासाठी आणखीन तीन हजार लागतात.
पण खरी गोळी तर बाहेरच्या जेवणात आहे. ऑफिसमध्ये जेवून जे पैसे वाचवले ते सगळे स्विगी आणि झोमॅटोवर गेले. बाहेर हॉटेलमध्ये जाणं आणि घरी जेवण मागवणं यातच तिचे 12 हजार रुपये गेले. हा भाड्यानंतरचा सगळ्यात मोठा खर्च आहे. सहज म्हणून ॲप उघडायचं आणि ऑर्डर टाकायची, या सवयीमुळे महिन्याच्या शेवटी मोठं बिल झालं. म्हणजे फक्त जेवणावरच तिचे जवळपास 17 हजार रुपये गेले.
घर साफ करायला त्यांनी एक मदतनीस ठेवली आहे. त्यासाठी तिला 1 हजार द्यावे लागतात.येण्या-जाण्यासाठी ती स्वतःची बाईक वापरते. सप्टेंबरमध्ये पेट्रोलसाठी 3 हजार गेले. ज्या दिवशी बाईक नसते तेव्हा ती ऑटो किंवा कॅबने जाते. त्यासाठी अजून 4 हजार खर्च झाले. म्हणजे प्रवासाचा एकूण खर्च 7 हजार झाला.
आजकाल सगळ्यांचे असे काही खर्च असतात जे आपल्याला दिसत पण नाहीत आणि दर महिन्याला खात्यातून पैसे कापले जातात. शिवांजलीचे असे 6 हजार रुपये गेले. यात ओटीटी म्हणजे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, आयक्लाऊड, काही एआय टूल्स यांचे पैसे आहेत. आपण कशाचं सब्सक्रिप्शन घेतलंय हेच बऱ्याचदा लक्षात नसतं, पण पैसे मात्र जात असतात.
Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक
शेवटी राहिली शॉपिंग. कपडे, मेकअपचं सामान आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यावर तिचे 7 हजार रुपये तिथे गेले.सगळं मिळून हिशोब केला तर 63 हजार रुपये झाले. हा आकडा पाहून शिवांजली स्वतःच घाबरली. ती म्हणाली, मला पण वाटलं नव्हतं की एवढा खर्च झाला असेल.पण एक चांगली गोष्ट झाली की तिला कळलं तरी की पैसे कुठे चालले आहेत. तज्ज्ञ पण हेच सांगतात की आधी खर्च लिहून काढा, तरच बचत करता येईल. जोपर्यंत हिशोबच माहीत नाही तोपर्यंत पैसे वाचवणं शक्य नाही.






