Does excessive consumption of ghee lead to weight gain(फोटो सौजन्य - सोशल मीडिया )
तूप आरोग्यदायी आहे म्हणून त्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे योग्य असे नाही. दिवसाला साधारण ५ ते १० ग्रॅम तूप म्हणजे एक ते दोन चमचे तूप सेवन करावे .पण प्रत्येक व्यक्तीची चांगल्या आहाराची गरज, शारीरिक हालचाल आणि आरोग्याची स्थिती वेगवेगळी असू शकते . ज्यामुळे तुपाचे प्रमाण ठरवताना त्या गोष्टींचाही विचार करावा लागतो.
तूप जास्त खाल्ल्याने वजन वाढते का?
त्यासाठी तूप आणि वजनवाढ यांचा संबंध समजून घेणे गरजेचे आहे. तूप हा एक ऊर्जेचा म्हणजेच जास्त कॅलरीजचा स्रोत मानला जाणारा पदार्थ आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात गरजेपेक्षा जास्त तूप वापरल्यास केल्यास एकूण कॅलरीजचे प्रमाण अधिक वाढू शकते. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्यामुळे वजन वाढण्याच प्रमाण जास्त असते. चपातीवर भरपूर तूप लाऊन , प्रत्येक पदार्थात तूप घालणे, त्यासोबत इतर तेलकट पदार्थ खाणे या सवयींमुळे अतिरिक्त कॅलरीज शरीराला मिळतात .
तूप वापरण्याची पद्धत तितकीच महत्त्वाची आहे.कारण स्वयंपाक करताना तूप आवश्यकतेपेक्षा जास्त तापवणे,वापरणे किंवा सतत गरम करणे टाळा. अतिउष्णतेमुळे तुपातील चरबीमध्ये ऑक्सिडेशनसारख्या प्रक्रिया होतात आणि त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तूप धूर येईपर्यंत तापवणे बंद करावे आणि गरमागरम चपातीवर थोडेसे तूप लावून सेवन करावे.
डॉक्टरांच्या मते, चपातीवर तूप लावणे हे चुक नाही. तर त्याचे प्रमाण नियंत्रणात असणे आवश्यक असते . वजन कमी करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांसाठी , तर तूप पूर्णपणे बंद करण्यापेक्षा दिवसभरातील एकूण कॅलरीजचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते . चपातीवर थोडे तूप लावले तरी दिवसभरातील इतर तेल, तूप आणि चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण लक्षात घेऊन सेवन करावे. त्याचबरोबर संतुलित आहार व नियमित शारीरिक हालचाल यांची सांगड घातल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते .
Ans: तुपाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीचे वय, आहार, शारीरिक हालचाल आणि आरोग्याच्या स्थितीनुसार ठरते. दिवसाला एक ते दोन चमचे तूप काही व्यक्तींच्या आहारात बसू शकते; मात्र, त्यासोबत इतर पदार्थांमधून मिळणाऱ्या चरबीचाही विचार करणे आवश्यक आहे.
Ans: हो, वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना चपातीवर थोडे तूप लावून खाऊ शकता. मात्र, दिवसभरातील एकूण कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आणि इतर तेलकट पदार्थांचे सेवन मर्यादित करणे महत्त्वाचे आहे.
Ans: तूप पूर्णपणे बंद केल्याने वजन लवकर कमी होते का?






