
बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती पत्नी, मागून पती आला अन् भररस्त्यात सुरु झाला राडा; Video Viral
‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही…’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral
काय आहे प्रकरण?
घरातून खोटं कारण सांगून पत्नी घराबाहेर पडली पण काही क्षणातच तिचं भांड उघडं पडलं. पतीने रस्त्यातच पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत मोमज खाताना पकडलं ज्यानंतर जोरदार तांडव सुरु झाला. ही घटना भोपाळच्या अशोका गार्डन पोलिस ठाण्याच्या परिसरात घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, पती नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीसाठी घरातून निघाला. वाटेत भूक लागल्याने त्याला मोमोजचा एक स्टॉल दिसला आणि त्याने आपल्या मित्राला गाडी थांबवायला सांगितले. मोमोजच्या स्टाॅलजवळ जाताच पतीला असं काही दिसलं ज्याने त्याचे डोळे खुलेच्या खुलेच राहिले. पतीने पाहिले की मोमोजच्या स्टाॅलवर त्याची पत्नी वेगळ्या पुरुषासोबत मोमज खात आहे.
Extra-Marital Affair Kalesh in Bhopal (Husband Allegedly Catches Wife With Boyfriend at Momo Stall) pic.twitter.com/oA5sYokaqu — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 17, 2026
पत्नीचं अफेअर पकडल्यानंतर पतीचा संयम सुटला आणि भरसत्यात तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये पती पत्नीला जाब विचारताना, प्रश्न विचारताना दिसतो. तो स्टाॅलजवळून पत्नीला वेगळं नेतो आणि तिला घडलेल्या प्रकराविषयी प्रश्न विचारायला सुरुवात करतो. यावेळी पत्नी मात्र मान खाली घालून असते. व्हिडिओत पुढे पती पत्नीला मारहाण करतानाही दिसतो. यावेळी घटनास्ठळी उपस्थित काही लोक हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात पण पती काही ऐकून घेण्यास तयार नसतो. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित एक व्यक्ती आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतो आणि याचेच फुटेज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.