शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवलं! पिसाळलेल्या बैलाने भरबाजारात व्यक्तीवर केला हल्ला, थरारक Video Viral
सध्याच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर फार वाढला आहे. आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. तुम्ही आपल्या रोजच्या वापरात सोशल मेडियावाचा वापर करत असाल तर तुम्ही यावर व्हायरल होणारे व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. हे व्हायरल व्हिडिओज बऱ्याचदा लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. यात असे अनेक व्हिडिओ असतात जे आपल्याला थक्क करतात तर काही इतके मजेदार असतात की त्यांना पाहून आपले हसू अनावर होते.
यातच आता नुकताच सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका पिसाळलेल्या बैलांने बाजारात लोकांवर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक बैल अचानक बाईक एजन्सीमध्ये घुसतो आणि दुसऱ्याच क्षणी लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. बैलाचा हल्ला इतका भीषण असतो की, तेथे उपस्थित असलेले लोकही ते पाहून हा सर्व प्रकार पाहून घाबरतात आणि आपला जीव वाचण्यासाठी सर्वत्र पळू लागतात.
हेदेखील वाचा – किंग कोब्रासोबत रोमान्स करू लागली महिला, जीभ बाहेर काढत घेतली किस, मग कोब्राने जे केलं… धक्कादायक Video Viral
घटनवेळी हा पिसाळलेला बैल लाल रंगाच्या शर्ट घालतलेल्या व्यक्तीच्या मागे पळत त्याच्यावर हल्ला चढवतो. व्यक्ती पळत राहतो मात्र बैल काही त्याला सोडत नाही आणि त्याच्या मागे पळत अखेर आपल्या शिंगांनी त्याच्यावर हल्ला करतो. बैल आपल्या शिंगांनी व्यक्तीला वर उचलून आपटणारच असतो तितक्यात तो व्यक्ती सराईतपणे तिथून पळून जातो. यावेळी बैलाने तिथे उभ्या असलेल्या गाड्यांची नासधूस केली आणि संपूर्ण बाजारात गोंधळ माजवला ज्याने लोकांना फार मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ पाहून आता अनेक युजर्स थक्क झाले आहेत.
Bull Attacks on a Guy inside Bike Agency
pic.twitter.com/jNdPDDpm3p— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 11, 2024
हेदेखील वाचा – आईची चूक बेतली मुलाच्या जीवावर! भररस्त्यात स्कुटरवरून खाली पडला चिमुकला, संतापजनक Video Viral
अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बाईक एजन्सीच्या आत असलेल्या एका व्यक्तीवर बैलाचा हल्ला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “बैलांना लाल रंग आवडत नाही.. बरेच लोक लाल पोशाख घालतात.. कधी कधी हे खूप धोकादायक ठरते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बैलाला त्या व्यक्तीची काही वैयक्तिक समस्या असावी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.