भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (फोटो- सोशल मिडिया)
याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 डिसेंबरपासून तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबररोजी भारत अन् दक्षिण आफ्रिकेमध्ये एकमेव कसोटी सामना होणार होता. मात्र आता नव्या वेळापत्रकानुसार, या दौऱ्याची सुरुवात 9 डिसेंबरपासून एकमेव कसोटी सामना खेळून होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ वनडे सिरिज खेळणार आहे. नुकतेच भारतीय महिला संघाने इंग्लंडवोइरूद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता आणि तो सामना 270 रन्सच्या फरकाने जिंकला होता.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये लिमिटेड ओव्हर्सचा खेळ वनडे सिरिजपासून सुरू होणार आहे. वनडे सिरिज खेळून झाल्यावर दोन्ही संघ टी 20 सिरिज खेळणार आहेत. पहिला वनडे सामना 16 तर दुसरा 19 आणि तिसरा सामना 22 डिसेंबर रोजी होणार आहे. तर टी 20 सिरिजचे सामने 26,29 आणि 30 डिसेंबर रोजी होणार आहेत.
वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर
भारत अन् दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात टी 20 सामन्यांचे वेळापत्रक समाविष्ट करण्यात आले आहे. ‘आम्हाला भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचे नवे वेळापत्रक सांगताना अत्यंत आनंद होत आहे. यामध्ये तीन 20 सामन्यांचा सहभाग करण्यात आला आहे. यामुळे यांच्या संघाला पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱ्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे.
एकमेव कसोटी सामना
९ – १२ डिसेंबर २०२६ – सेंट जॉर्जेस ओव्हल, गेकेबेरा
एकदिवसीय मालिका
१६ डिसेंबर २०२६ – बोलँड पार्क, पार्ल
१९ डिसेंबर २०२६ – न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केप टाऊन
२२ डिसेंबर २०२६ – मंगाउंग ओव्हल, ब्लोएमफॉन्टेन
अभिमानास्पद क्षण! लॉर्डसवर रचला इतिहास; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केला Kranti Goud चा गौरव
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका
२६ डिसेंबर २०२६ -विलोमूर पार्क, बेनोनी
२९ डिसेंबर २०२६ – एनडब्ल्यूसी ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
३० डिसेंबर २०२६ – एनडब्ल्यूसी ओव्हल, पॉचेफस्ट्रूम






