सिंहाच्या पिंजऱ्यात चिमुकला जाऊन पडला, राजा हल्ला करणार तितक्यात आईने मारली उडी; पुढे जे घडलं... Video Viral
सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याच्या शक्तीपुढे माणसंच काय तर मोठमोठे प्राणीही आपली हार मानतात. सिंह आपल्याला एकतर प्राणीसंग्रहालयात पाहायला मिळतात किंवा मग जंगलात पाहायला मिळतात. दरम्यान नुकत्याच एका प्राणीसंग्रहातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सिंहाच्या पिंजऱ्यात एक चिमुकला मुलगा चुकून खाली पडल्याचे दिसते, ज्यानंतर संपूर्ण वातावरण भितीदायक बनते. मुलगा आता सिंहाचा शिकार होतोय का काय असं वाटत असतानाच त्याची आई खाली उडी मारते आणि मग जे घडतं ते पाहण्यासारखं ठरतं. चला तर मग व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
आई ही शेवटी आईच असते. ती आपल्या मुलाला वाचवण्यसाठी कोणताही धोका पत्करायला मागेपुढे बघत नाही आणि आताच्या व्हिडिओमध्येही असंच काहीस घडताना दिसून आलं. सिंहांना पाहण्यासाठी आलेल्या चिमुकल्याचा तोल गेला आणि तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. त्याला असं खाली पडल्याचं पाहून सिंहाचा कळप देखील लगेच उठून उभा राहतो जे पाहून मुलाची आई आणखीन घाबरते. चिमुकल्याला वाचवण्यासाठी आईचा जीव कासावीस होतो आणि कोणताही विचार न करता ती लगेच सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारते. यांनतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. जमिनीवर पडलेला मुलगा घाबरून लगेच उठतो आणि कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला पळण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या सुरक्षेसाठी आईही सिंहाचं लक्ष वेधत त्याच्यामागे पळते. यादरम्यान प्राणीसंग्रहातील एक कर्मचारी देखील तिथे आल्याचे दिसते जो सिंहांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. पुढे काय घडलं हे व्हिडिओत स्पष्ट झालं नसलं तरी व्हिडिओमधील सर्व घटनेत सिंह फारसे भडकलेले दिसत नाहीत ज्यामुळे निश्चितच यात कोणतीही जीवितहानी झालेली नसावी.
व्हिडिओ पाहून आता काहींनी याच्या सत्यतेवर प्रश्न निर्माण केले असून काही लोक याला एआयद्वारे तयार केलेला व्हिडिओ मानत आहेत. घटनेचा व्हिडिओ @cold.ed1t नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला AI चा द्वेष वाटतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई असणं म्हणजे नेमकं हेच असतं ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आई नेहमीच आपल्या मुलांसाठी आपले जीवन देतात आणि त्याबद्दल कधीही विचार करत नाहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.