(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडियावर असे अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात, ज्यातील दृश्ये पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच होणार नाही. इथे प्राण्यांचेही अनेक दृश्ये शेअर केली जातात. अशात नुकताच एका अजगराचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात प्राण्याने एका माणसाला वाईटरित्या जकडल्याचे दिसून आले. आता अजगर हा जंगलाचा एक धोकादायक प्राणी आहे, अशात त्याच्यासोबत मस्ती करणं आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतं आणि असंच काहीसं व्हिडिओत घडल्याचं दिसून आलं. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस एका मोठ्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो, परंतु साप मागे वळून त्याला घट्ट पकडतो. व्हिडिओमध्ये, तो माणूस एका हाताने अजगराची मान घट्ट पकडताना दिसतो, तर साप त्याच्या शरीराभोवती वेगाने फिरतो. या काळात, अजगर हळूहळू त्याची पकड घट्ट करतो आणि काही वेळातच तो त्या माणसाच्या हातापायाभोवती विळखा घालतो. हा विळखा इतका जबरदस्त असतो की माणसाला यातून आपली सुटका काही केल्या करता येत नाही. व्हिडिओच्या शेवटी, तो माणूस कसा तरी अजगराच्या भयानक तावडीतून सुटण्यात यशस्वी होतो. पण तोपर्यंतचे सर्वच दृश्ये इतके भयानक होते की पाहून यूजर्स घाबरुन जातात. अजगरासोबतची मस्ती आपल्याला किती महागात पडू शकते, ते आपल्याला व्हिडिओतून दिसून येते.
हा व्हायरल व्हिडिओ @german.a.almonte नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा अजगर खूप मजबूत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तो माणूस अजगराच्या वाटेला गेलाच कशाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटलं तो अजगराचे भोजन होईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.