
उपचारादरम्यान मुलावर भूताटकीचं सावटं, भिंतीवर चढत करु लागला विचित्र प्रकार, त्या थरार घटनेचा Video Viral
वाढदिवसाची नशा की वेडेपणा… ! पेट्रोल ओतलं, रस्त्यावर आग लावून तरुणाने साजरा केला बर्थडे; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये एक मुलगा हाॅस्पिटलच्या बेडवरुन उठून भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तो बेडच्या कोपऱ्यावर उभा असतो, त्याचे दोन्ही हात भिंतीला चिपकून असतात आणि तो जणू भिंतीवर चढून वर जाण्याच्या प्रयत्न करत असतो. यावेळी तो काही विचित्र आवाज काढतानाही व्हिडिओत दिसून येते. व्हिडिओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण त्यातील कृती अनेकांना थक्क करणारी ठरते. मुलाच्या या अवस्थेला पाहून आता यूजर्सने त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओमुळे भूताटकीच्या त्या कथांना आता नव्याने खतपाणी मिळाल्याचंही दिसून आलं आहे. कारण व्हिडिओमुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा भूताच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान ही घटना राजस्थानमध्ये घडून आल्याचे सांगण्यात येत आहे.
RAJASTHAN HOSPITAL VIDEO SHOWS TEENAGER DISPLAYING STRANGE BEHAVIOR DURING TREATMENT SPARKING FEAR DEBATE 😨 pic.twitter.com/46mUzbiLvP — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 28, 2026
हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘राजस्थानमधील रुग्णालयाचा व्हिडिओ समोर; उपचारादरम्यान एका किशोरवयीन मुलाचे विचित्र वर्तन पाहून भीतीचे वातावरण आणि चर्चांना उधाण’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्याला लवकरात लवकर मानसोपचार मिळणे गरजेचे आहे; हा काही सोशल मीडियावर पोस्ट करण्यासारखा प्रकार नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्पायडरमॅनचं भूत त्याच्या अंगात शिरलं आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “से व्हिडिओ पोस्ट करू नका. तुम्ही कोणाच्या तरी वैद्यकीय समस्येचा फायदा घेऊन व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे ताबडतोब काढून टाका”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.